शरद पवार आणि आमच्यात कुठं काय खटकलं? हे मला सांगता येणार नाही, असं डॉ. ज्योती मेटे यांनी म्हटलंय. शिवसंग्राम प्रदेश कार्यकारणीसोबत चर्चा करून लोकसभा निवडणुकीविषयी कोणासोबत जायचं? याचा निर्णय घेणार. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांनी स्पष्ट केलं आहे.
मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केलाय, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक लढवावी असा जनतेचाच आग्रह होता. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
ज्योती मेटे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चा अन जरांगे पाटील यांचे बीडमधील सहकारी देखील उपस्थित होते. समाज म्हणून आम्ही ज्योती मेटे यांच्यासोबत आहोत, असं मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सांगितलं आहे.
No comments:
Post a Comment