Tuesday, April 16, 2024

वादळी वाऱ्याचा तडाखा. भाळवणी गावातील २५ घरांचे छत उडाले आवकाळी ने शेतकऱ्यांचे नुकसान.

आष्टी (प्रतिनिधी) : राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान अजूनही सुरूच आहे. बीड  जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जिरदार पाऊस  झाला. यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. आज देखील बीडच्या आष्टी  तालुक्यातील भाळवणी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेकांच्या राहत्या घरावरील छत कोसळले आहेत. तर पत्रे देखील उडून गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. विशेष म्हणजे गावातील जवळपास २५ घरावरील पत्रे उडून गेले आहेत.
भरपाईची मागणी 
दुसरीकडे शेतातील फळबाग उन्मळून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे. त्यामुळं शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment