Thursday, April 18, 2024

वडगाव दादाहरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप; बहुजन विकास मोर्चाचा उपक्रम.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती परळी तालुक्यातील मौजे दादाहरी वडगाव येथे आज गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांच्या मार्गदर्शनाखाली व परळी शहराध्यक्ष मनोहर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शेकडो गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वही व पेन वाटप करण्यात आले.

परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे दादाहरी वडगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहणही करण्यात आले. 
यावेळी व्यासपीठावर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते भास्कर नाना रोडे, प्रा दासू वाघमारे सर, राजन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांच्या मार्गदर्शनाखाली  गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही व पेन वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमास मौजे दादाहरी वडगाव व पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक, बहुजन विकास मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबेडकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे आभार बहुजन विकास मोर्चाचे शहराध्यक्ष मनोहर उर्फ बंडू मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment