गजमफर ऊर्फ पप्पू इनामदार असं अपघातात मृत्यू झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. तर सय्यद चाँद असं गंभीर जखमी असल्या पोलिस जमादाराचे नाव आहे. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माजी नगरसेवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेक गजमफर ऊर्फ पप्पू इनामदार आणि केज ठाण्यातील जमादार सय्यद चाँद हे दोघे स्विफ्ट डिझायर कारने बीडकडे जात होते. कोरेगाव शिवारात तांदळे वस्तीजवळच्या वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन उलटली.
यादरम्यान कारने तीन ते चार वेळा उलटी. या अपघातात गंजमफर ऊर्फ पप्पू इनामदार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी सय्यद चाँद हे जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
No comments:
Post a Comment