Sunday, March 5, 2023

प्राध्यापिकेची विद्यार्थ्याला लाथा- बुक्यांनी मारहाण, पालकाची शिवाजीनगर पाेलिसांत धाव.

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड येथील एका महाविद्यालयात प्राध्यापिका महिलेने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे विद्यार्थ्याच्या पालकांनी प्राध्यापिकेविरुद्ध पाेलिस ठाण्यात धाव घेतली. 
संबंधित विद्यार्थ्याने प्राध्यापिकेने कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचे पालकांना सांगितले. त्यानूसार पालकांनी माझ्या मुलाला मारहाण करण्यात आली. तू कसा पास हाेताे हे मी पाहते असा दम भरल्याची तक्रार पाेलिसांत दिली. याबाबतची तक्रार शिवाजीनगर पोलिसांनी नाेंदवून घेतली आहे. प्राध्यापिकेवर एनसी दाखल केली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली
दरम्यान या घडलेल्या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी महाविद्यालयाने पावले उचलली आहेत. महाविद्यालयाने त्रीसदस्य समिती नेमली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर महाविद्यालय प्रशासन प्राध्यापिकेवर पुढची कारवाई करेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment