DRI ला गुप्त माहिती मिळाली होती की, सोमवारी पहाटे अदिस अबाबा येथून येणारा प्रवाशी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सोबत घेऊन येत आहे, हा प्रवासी मुंबई विमातळावर उतरताच त्याला DRI ने ताब्यात घेतलं त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्यातून १२ साबणाच्या वड्या जप्त करण्यात आल्या.
यावेळी या वड्यांची पाहणी केली असता त्यातूनच अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचं उघड झालं. यावेळी एकूण २.५८ किलो कोकेन जप्त करण्यात आल आहे. याची किंमत जवळपास २५ कोटी रुपये आहे. अमली पदार्थांची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या इसमाला देखील DRI ने सापळा रचून अटक केली आहे.
No comments:
Post a Comment