Saturday, May 1, 2021

परळी शहर पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन.ना हेल्मेट ना आधार; राजरोसपणे फळ विक्री चालू.


* असे असेल तर कशी तुटेल कोरोनाची साखळी परळीकरांनमध्ये प्रश्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.1
जिल्हाधिकारी बीड यांनी शनिवार व रविवार कडक लोकडाऊन केलेला असताना, तसेच हेल्मेटची व आधार कार्डची सक्ती केलं नंतर,सुद्धा परळी शहराच्या रस्त्यावरती फळविक्रेते व बिनकामी लोक मोटर सायकल वरून फिरताना दिसत आहेत.
नियमांचे उल्लंघन करण्यात लोकांना वेगळाच आनंद दिसत आहे, परंतु ज्या पोलिस प्रशासनावर याची जबाबदारी आहे ते कारवाई करायचं सोडून, इतरच गोष्टीत जास्त रस असल्याचे दिसून येत आहे,
 परळी शहरात मात्र नागरिक तसेच फळ विक्रेते सर्रास पणे मुख्य रस्त्यावर फिरत असून परळी शहर पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरीक स्वतःच्या घराच्या दरवाज्यासमोर उभे असताना शहर पोलीस मात्र त्यांना अरेरावीची भाषा करीत असल्याचे दिसून येत आहे . यापेक्षा बिनबोभाट फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली तर कोरोणाचा संसर्ग वाढणार नाही हे मात्र नक्की. त्यामुळे वेळीच पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांनी सांगितलेल्या नवीन नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment