* लाचखोर डीवायएसपीच्या बॉडिगार्डचाही समावेश
* लाचखोर डीवायएसपी सुधीर खिरडकरसह अन्य सात-आठ पोलिस कर्मचाऱ्यांनी भाजप पदाधिकारी शिवराज नारियलवाले यांना बेदम मारहाण केली होती.
जालना : (प्रतिनीधी) भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराय नारियलवाले यांना अमानुषपणे मारहाण प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्ष विनायक देशमुख यांनी शुक्रवारी याबाबत आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे लाचखोरी प्रकरणात घरी बसलेलेल्या डीवायएसपी सुधीर खिरडकर याच्या बॉडीगार्डचा देखील निलंबित कर्मचा-यामध्ये समावेश आहे. आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याच्यावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्षषलागले आहे.
7 एप्रिल रोजी जालना शहरातील दीपक हॉस्पिटल येथे तोडफोड केल्याप्रकरणी बळाचा वापर केल्याचा दावा करणारे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे देखील आता अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत, त्यांच्यासोबत मारहाण करणारे पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे,सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे या पाच जनांचे निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी काढले आहेत.
"याप्रकरणी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम याच्यासह वरील चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याचे सांगितले तर पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होऊ शकते असे संकेत दिले आहेत."

No comments:
Post a Comment