गोंदिया (प्रतिनीधी ) – तालुक्यातील ग्राम पंचायत सौन्दड येथील रहिवासी पत्रकार बबलू मारवाडे यांच्या घरावर स्थानिक भाजी विक्रेत्यांनी दांडे घेऊन हल्ला चढविला आहे, यात महिलांना समोर करण्यात आले आहे. त्यातच जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे
.सविस्तर प्रकरण असे आहे की सध्या करोना महामारी संपूर्ण जगात चालू आहे, अश्यात सौन्दड गावात सुद्धा मोठ्या प्रमाणे करोना बाधित लोकांचा आकडा समोर आला आहे, त्यातच 10 ते 12 लोकांचा करोना मुळे मृत्यू झाला आहे, अशे असताना गावात कंटेंमेंट झोन दोन वेळा लागले आहे, सध्या गावात कंटेंमेंट झोन आहे.
त्यातच आठवड्यात 2 वेळा गुरुवारी आणि सोमवारी असे दोन दिवस भाजी विक्री करिता दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत लावण्याची परवानगी मिटिंग च्या माध्यमातून देण्यात आली.
भाजी विक्रेत्यांनी नियमांचे पालन करून भाजी विक्री करणे बंधनकारक आहे, मात्र तसे होत नाही, यावर नागरिकांची गर्दी असलेले फोटो सहित बातम्या प्रशिधी करण्यात आल्या ज्यावर प्रशासन कार्यवाई करेल आणि गावात वाढत्या गर्दी ला नियंत्रणात आणून गावात वाढत्या करोना ला नियंत्रणात आणता येईल या हेतूने बातम्या लावण्यात आल्या, मात्र प्रशासन यावर कोणतेही कार्यवाई करीत नशल्याचे अनेक वेळा पाहण्यासाठी मिळाले, गावात वाढत्या करोना महामारीला स्थानिक प्रशासन जबाबदार आहे , असे यावरून लक्ष्यात येते त्यामुळे वारंवार बातम्या लावून प्रशासनाला जागे करण्याचे काम पत्रकाराने केले आहे.
त्यावर स्थानिक प्रशासन व पोलिश विभागाने आज भाजी विक्रेत्यांवर कार्यवाई केली आहे. भाजी विक्रेत्यांवर कार्यवाई करतान्हा स्थानिक प्रशासनाणे पत्रकाराचा नाव पुढे करून कार्यवाई केली, असे भाजी विक्रेते सांगतात ( पत्रकार बातम्या लावतोय म्हणून कार्यवाई करावी लागते ) त्या मुळे पत्रकाराच्या नावाने गावातील भाजी विक्रेते भडकले आणि घरावर हल्ला केला, एकंदरीत स्थानिक प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे गावात करोना वाढला आहे, त्या मुळे यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहजे असे मत मारवाडे यांनी वेक्त केले आहे.
तसेच घरावर हल्ल्या केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी वेळीच येऊन त्यांना हाकलून लावले, पत्रकार मारवाडे यांना व यांच्या परिवाराला काही झाल्यास सर्वस्वी जबाबदार सरपंच, व बॉडी तसेच भाजी विक्रते राहतील या बाबद पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. गावात 99% भाजी विक्रेते ( मरार ) या समाजाचे आहेत त्यातच सरपंच या त्यांच्याच समाजाच्या आहेत, लोकांना भडकविण्याचे काम सरपंच करतात असा आरोप देखील मारवाडे यांनी केला आहे, या पूर्वी सुद्धा गावातील लोकांच्या खोट्या सह्य घेऊन पत्रकाराला तळीपार करण्याचा ठराव ग्राम पंचायत मध्ये मंजूर करण्यात आला आहे जे की कायदेशीर नाही. या सर्व बाबींची माहिती अप्पर पोलिश अधीक्षक बनकर यांना देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment