परळी वैजनाथ -(प्रतिनिधी) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा गोंधळ त्वरित थांबवून लसीकरणाचे नियोजन करून सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.
परळी शहर व तालुक्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी परळी शहरात तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर वेळेवर लस पुरवठा होत नाही. आणि ज्या दिवशी लस दिली जाते त्या दिवशी कसलेही नियोजन केले जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना कडक उन्हात तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर नेहमीच लस संपल्याची कारणे पुढे केली जातात. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सावली नाही यामुळे येथे गैरसोय अधिकच होत आहे. 45 वर्षावरील व त्याखालील नागरिकांच्या लसी करणात पहिला व दुसरा डोस याचे नियोजन नाही. याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे, शहरातील लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ करावा अशी मागणी श्री देशमुख यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment