* सर्व नियमाची पायमल्ली! सामाजिक अंतराचा फज्जा!
परळी वैजनाथ :-( प्रतिनीधी) बीड जिल्ह्याच्या परळीत लॉकडाऊन फक्त नावालाच असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन
असतांना मात्र परळीत रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत चिकन मटण दुकान राजरोसपणे सुरू असून या ठिकाणी ग्राहक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. शॉप वाले मास्क न वापरता दुकाने थाटात आहेत. तर दिवसभर दुकानाचे शटर खाली करून चिकन मटण विकले जात आहे. याठिकाणी सर्व नियमाची पायमल्ली केली जात असून स्थानिक प्रशासन काय करत आहे?यांच्या साठी नियम वेगळे काढलेत का?
असा सवाल सर्व सामान्य जनतेत उपस्थित होत आहे.
पोलीस प्रशासन फक्त गाड्या पकडण्यात व्यस्त असून त्यांच्या डोळयांसमोर हे दुकानदार दुकाने उघडत आहेत! जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परळीत चाललंय काय याकडे जरा जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment