Sunday, May 16, 2021

दरोडेखोराचा प्रतिकार करताच शेतकऱ्याचा गळा आवळून केला खून.


पाटोदा (प्रतिनीधी) पाटोदा तालुक्यात चोरी करुन जाणाऱ्या दरोडेखोरांशी प्रतिकार करणाऱ्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दरोडेखोरांनी गळा आवळुन खून केल्याची धक्कादायक घटना वैद्यकिन्ही ता.पाटोदा येथे आज पहाटेच्या सुमारास घडली.

याप्रकरणात अज्ञात दरोडेखोरांनी गावातील अनेक घरांच्या कड्या लावल्या. काही दुकानांची कुलुपे देखील तोडली. सदरील प्रकारामुळे गावात दहशत पसरली आहे.

यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी विष्णु जाधव (वय ५५ ) यांनी त्यांचा प्रतिकार केला म्हणून जाधव यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर डीवायएसपी लांगोरे स्वतः पाटोदा पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत. झालेल्या घटनेची त्यांनी पुर्ण माहिती घेतली असून पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तपासाच्या दृष्टीने योग्य त्या सुचना दिल्या आहेत.

या प्रकारामुळे गावभर दहशत पसरली असुन पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथे आज पहाटे पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घ्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.मयत विष्णु जाधव यांचे आजुबाजुच्या घरांच्या कड्या लावुन दरोडेखोर जाधव यांच्या घरात घुसले होते.

No comments:

Post a Comment