Wednesday, May 26, 2021

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांचा वाढदिवस साजरा करत कोवीड सेंटरवर रूग्णांना वाचनिय ग्रंथाचे वितरण .


* शहरातील पत्रकारांना मास्क साॕनिटायझर ग्रंथाचे वाटप 

परळी वैजनाथ, दि.26(बातमीदार) -
कोवीड सेंटरवर कोरोनावर उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी, त्यांचे मन आनंदित व प्रसन्न रहावे यासाठी वाढदिवस साधेपणाने साजरा करत येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांनी कोरोना बाधित रूग्णांना कोवीड सेंटरवर जावून विविध ग्रंथाचे वितरण केले.
श्री शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष या पदावर असलेले येथील श्री देशमुख यांचा बुधवारी (दि.26) वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम  न घेता शहरातील विविध कोवीड सेंटरवर कोरोनावर उपचार घेत असलेल्या रूग्णांना सेंटरवर जावून पुस्तकाचे वाटप केले. यामुळे रूग्णांमध्ये आनंदाची भावना होती. आता आमचा वेळ सत्कारणी लागून वाचनात जाईल अशी प्रतिक्रिया रूग्णांनी यावेळी दिली. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते विविध केंद्रावर श्री देशमुख यांनी या पुस्तकाचे वाटप केले. दरम्यान, शहरातील पत्रकार बांधवाना मास्क, सॅनिटायझर, पुस्तक अशा कोरोना किटचे वितरणही वाढदिवसानिमित्त श्री देशमुख यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment