परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-परळी शहरातील स्वाभिमाननगर मधील एकाकडे गावठी पिस्टल असल्याचे गुप्त माहिती मिळताच परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांनी सापळा रचुन एकास अटक केली. त्यांच्याकडुन गावठी पिस्टल मँग्जीन सह जुने वापरते जप्त केले आहे परळी शहर डी बी पथकाचे या कामगिरीने परळीत सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, दिनांक 16/05/2021 रोजी राञी 10 चे सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, परळी येथील स्वाभिमाननगर येथील एक ईमस थांबला आहे त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे असी खात्रीलाईक बातमी मिळाल्याने गोपणीय माहीती दिलेल्या वर्णणावरुन त्या इसमास ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव संदीप भास्कर फड वय- 30 वर्ष रा. स्वाभिमाननगर परळी वैजनाथ असे सांगीतले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कमरेला आतुन ठेवलेला एक गावठी पिस्टल मॅगझीन सह असलेले मिळुन आले त्यांच्या कब्जात असलेल्या गावठी पिस्टलचे लायसन्स विचारले असता त्यांनी त्यांचेकडे शस्ञ बाळगण्याचे कोणतेही परवाना नसल्याचे सांगीतले त्यांच्या विरुध्द भास्कर केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस स्टेशन गुर.नं 75/2021कलम 3/25 भारतीय हत्यार कायदया प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.ही कार्यवाही परळी शहरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे,सुंदर केंद्रे ,श्रीकांत राठोड,शरद सुर्यवंशी यांनी केली आहे पुढील तपास पोलीस जमादार चव्हाण हे करत आहेत
Monday, May 17, 2021
परळीत गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment