Tuesday, June 16, 2020

नविन वसाहत गांधीनगर परिसरातील रस्ते झाले चिखलमय. नगर पालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

बीड (प्रतिनीधी )ः- शहरालगत असणार्‍या नविन वसाहतीमध्ये नगर पालिकेकडून योग्य ते नागरी सुविधा पुरवल्या जात नसल्याने नागरीकांना विविध अडचणीला तोंड द्यावे लागते. गांधीनगर येथील नूर कॉलनीसह अन्य भागातील रस्ते अत्यंत खराब असल्याने पावसामुळे या रस्त्यावरुन चालणे मुश्कील झाले. रस्ते दुर्लक्ष करण्याकडे नगर पालिका प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. 
नगर पालिका प्रशासन विकास केल्याचा दावा नेहमीच करत आलेले आहे. मात्र विकास कुठला केला असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहरालगत असलेल्या नविन वसाहतीमध्ये नागरी सुविधा पुरवण्याकडे नगर पालिका प्रशासन जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत आहे. रस्ते, नाल्या या भागात नसल्याने नागरीकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. गांधीनगर येथील नूर कॉलनीमध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. सध्याचे पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर नुसता चिखल झाला. या चिखलामुळे नागरीकांना येण्या -जाण्यास त्रास होवू लागला. नगर पालिका प्रशासनाला सदरील भागातील रस्ते दिसत नाही का? विकासाचे फक्त पोकळ दावे नगर पालिकेचे सत्ताधारी सातत्याने करत असतात. लोकांची दिशाभूल करणे थांबवावे आणि नुर कॉलनीसह इतर भागातील रस्त्यांची कामे तात्काळ करावीत अशी मागणी या भागातील नागरीकांतून केली जात आहे.

No comments:

Post a Comment