Saturday, June 6, 2020

मांजरसुंबा जवळ मोटारसायकलला स्विफ्टची धडक आई ठार, मुलगा जखमी.

बीड ; - भरधाव वेगात निघालेल्या स्विफ्ट डिझायरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा जखमी झाला. हे माय-लेक पुणे येथून येत असल्याचे सांगण्यात येते. ही घटना मांजरसुंबा जवळ आज दुपारी घडली. 
 कमल साळवे व ऋषिकेश साळवे हे माय-लेक आज दुपारी पुण्याहून मोटार सायकलवरून येत होते. मांजरसुंबा येथे त्यांच्या मोटार सायकलला एका स्विफ्ट डिझायर कारने जोराची धडक दिली. या अपघातात कमल साळवे ही महिला गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाली तर मुलगा ऋषिकेश साळवे यास उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment