बीड;--( प्रतिनीधी ) ग्रामीण भागात शेतकर्यांचे आलेले दुष्काळी अनुदान आणि इतर अनुदानापोटी आलेली रक्कम देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही शाखांनी दलालांची नियुक्ती केली असून गावातील सर्व शेतकर्यांची यादी आणि अनुदानापोटी आलेली रक्कम गावातीलच एका दलालाच्या हाती सोपवून वाटप केले जाते. त्यासोबतच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत असलेल्या सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्रही दलालाच्या मध्यस्थीतूनच शेतकर्यांना घ्यावी लागते.
मध्यवर्ती बँकेच्या ग्रामीण भागातील शाखेत ज्या गावचे अनुदान आलेले आहे अशा गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी करून बँक शाखेत नेहमी येणार्या गाव पुढार्याकडे याद्या आणि पैशे दिले जातात. पिंपळनेर शाखेअंतर्गत कुक्कडगाव येथे अनुदान वाटप करताना गावातील पुढार्यांकडे लाभार्थ्यांचे पैशे देऊन कमिशन घेण्याचे सांगितले गेले. हे शेतकर्यांचे अनुदान पाचशे असो अथवा पाच हजार रुपये असो एका खातेदाराला पैशे देण्यासाठी प्रत्येक खातेदार दीडशे रुपयांचे कमिशन जे की बेकायदेशीर अशा पद्धतीने हा दलाल वसूल करतो. या दीडशे रुपयाच्या प्रति लाभार्थी कमिशनमुळे बँकेचे व्यवस्थापक, बँकेचे कॅशियर, बँकेचे तपासणीस आणि हा दलाल पुढारी यांच्यामध्ये वाटून घेतले जाते. बँकेच्या शाखेअंतर्गत सोसायटयांमध्ये लागणार्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी शेतकरी गेला तर त्याला तीन ते चार दिवस लावले जाते मात्र हेच काम काही पैसे देऊन र्बठकेने आणि सोसायटींनी नेमलेल्या दलाला सांगितले तर अवघ्या दोन ते तीन तासात प्रमाणपत्र उपलब्ध होते. या सर्व शाखेच्या अधिकारी आणि दलालांच्या कामाकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ अधिकारी, चेअरमन आणि संचालक जाणीवूर्वक दुर्लक्ष करतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये मयत झालेला शेतकरी असेल किंवा ग्राहक असेल किंवा वयोवृद्ध असेल अशांचे पैशे काढण्यासाठी त्या त्या घरात जर माणूस गेला तर त्याला सतराशे साठ कागदं आणायला आणि अनुदानापेक्षा जास्त किमतीचे बॉन्ड आणायला हे अधिकारी भाग पाडतात. तरीही त्याला लवकर त्याच्या नातेवाईकाच्या खात्यावरचे पैसे मिळत नाहीत. असे असताना मग दलालांच्या हातावर यादी आणि पैसे कसे ठेवले जातात? या सर्व मिलिभगतीकडे जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन या बँक शाखेच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भरडलेल्या शेतकर्यांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment