Monday, June 15, 2020

जातेगाव परिसरात वीज अंगावर कोसळून मुलाचा मृत्यू .तर वडील किरकोळ जखमी.

गेवराई -; (प्रतिनीधी )
दिवसभर शेतात काम करून सायंकाळी वडिलांसह घरी येत असताना अंगावर वीज कोसळून मुलाचा जागीच मृत्यू तर वडील किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 5 च्या सुमारास तालुक्यातील जातेगाव परिसरात घडली.
रवी अर्जुन पवार (वय वर्ष 26) रा.जातेगाव असे मयताचे नाव आहे. दिवसभर शेतात काम करून वडिल अर्जुन पवार व रवी अर्जुन पवार हे दोघे बापलेक घराकडे येत असताना वादळ वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू असताना अचानक वीज अंगावर कोसळूली यात मुलगा रवी पवार हा गंभीर जखमी झाला व वडील अर्जुन पवार हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान त्याला जातेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याला बीड येथे हलवण्यात आले असता त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला असून सदरील मृतदेह जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलाआहे. या घटनेने जातेगाव येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

No comments:

Post a Comment