* सलग तिसऱ्या दिवशी झाली दरवाढ.
लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रविवारी पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ६० पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ६० पैशांची वाढ झाला होती. त्यांतर आज पुन्हा एकदा दरवाढ करून पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे.
मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ केली. यानंतर मुंबईतील पेट्रोलचा दर ८०.०१ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ६९.९२ रुपये प्रति लीटर झाला. तर दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर वाढून ७३ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ७१.१७ रुपये प्रति लीटर इतका झाला आहे
No comments:
Post a Comment