* दोन लग्नाला हजेरी लावत केले होते वाढप्याचे काम, अनेकांना केले बाधीत,
स्वॅब देण्यास दिला नकार,नवरदेवासह वर्हाडी मंडळीवरही होणार गुन्हा दाखल.
बीड :- हैद्राबादहून परतल्यानंतर प्रशासनाने सक्तीने क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचना झुगारून २ लग्नाला हजेरी लावत आलेल्या पाहुण्याला जेवायला वाढले. बीड शहरभर फिरले त्यानंतर त्यातील पाच जण पॉझिटीव्ह आल्यानंतर इतरांनी स्वॅब देण्यास नकार दिला. क्वारंटाईनही राहिले नाही. त्यामुळे बीड शहर पोलीस ठाण्यात पन्नास जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ते ज्या दोन लग्नाला हजर राहिले ते देखिल लग्न विना परवाना लावण्यात आले आहे. यालाही मोठी गर्दी होती त्यामुळे दोन्ही लग्नातील आयोजकांसह वर्हाडी मंडळी आणि नवरदेवावर गुन्हा दाखल होणार आहे.
कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी पोलिस, आरोग्य विभाग जीवाचे रान करत आहेत. मात्र काही लोक जाणीवपुर्वक सूचनांचे पालन करत नसल्याने कोरोनाचा बीडमध्ये स्फोट होत आहे. हैद्राबाद येथे जावून परत आलेले पाच जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यापुर्वी तेच शहरभर फिरले, त्यांच्या संपर्कात अनेक जण आले. त्या लोकांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिल्या मात्र त्यांनी क्वारंटाईन न राहता शहरभर फिरले त्यामुळे त्यांच्यावर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील झमझम कॉलनी व मसरत नगर भागातील चौघे २७ मे रोजी हैद्राबादलाजावून परत आले होते. त्या सर्वांना क्वारंटाईन केले होते. मात्र यातील काही जण बाहेर पडून इतरांना बाधीत केले. त्यांच्या बेशिस्तीमुळे इतरांचे आरोग्य धोक्यात आले. त्यांच्या संपर्कातील काहींना कोरोनाची बाधा झाली त्यांनी कोरोनाची माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली. आरोग्य सेतू ऍपवरही माहिती भरली नाही त्यामुळे बाधीतांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे प्रशासनाला अवघड गेले शिवाय या लोकांनी कुठलेच सहकार्य प्रशासनाला केले नाही त्यामुळे मंडळाधिकारी परमेश्वर राख यांच्या फिर्यादीवरून मुख्य सात आरोपीसह इतर ५० जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात कलम १८८, १८६, २६९, २७०, २७१, सह कलम ५४ राष्ट्रीय आपत्ती १,२,३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेले सर्व आरोपी सध्या क्वारंटाईन आहेत.
No comments:
Post a Comment