Monday, June 8, 2020

स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात कोविड-19 विषाणू चाचणी प्रयोग शाळेचे ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण.


आज सुरू करण्यात आलेल्या अंबाजोगाई येथील कोविड-19 विषाणू चाचणी प्रयोग शाळेचा उपयोग बीड जिल्ह्यासाठीच नव्हे तर परिसरातील जिल्ह्यांसाठीही होईल. तात्काळ चाचण्या होऊन कोरोनाचा
प्रादुर्भाव रोखता येईल, असं म्हणत सदरचे सेंटर येथे आणण्यासाठी
जिल्हाधिकार्‍यांसह आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी मोठे प्रयत्न केल्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी म्हटले.
कोविड-19 विषाणू चाचणी प्रयोग शाळेचे लोकार्पण आज सामाजिक न्यायमंत्री
धनंजय मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये झाले. या वेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आ. संजय दौंड,
उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, शिवसेना
जिल्हाप्रमुख सचिन मुळुक हे उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स)चे पालन करून आज अत्यंत साध्या पणाने हा लोकार्पण सोहळा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय
महाविद्यालयात पार पडला. कोविड-19 विषाणू चाचणी प्रयोग शाळेस आवश्यक
सामग्री तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची मान्यता मिळाली असून
आजपासून चाचणीला सुरुवात करता येणार आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान
संस्थान नागपूरच्या संचालिका तथा मुख्याधिकारी मेजर जनरल डॉ. विभा दत्त
यांनी प्रयोग शाळेस मान्यता देऊन चाचणी करण्यास अनुमती दिली. लोकार्पण
झाल्यानंतर ना. धनंजय मुंडे म्हणाले की, सुरुवातीला मुंबई, पुण्यासह अन्य
मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळायचे. मात्र गेल्या महिन्या भरापासून आपल्या जिल्ह्यातून मुंबई, पुणे येथे असलेले लोकजिल्ह्यात परत आले आहत आणि आपल्याकडे कोरोनाची लागण झाली आहे.आपल्याला कोरोना चाचणी करण्यासाठी औरंगाबाद, लातूर या ठिकाणी स्वॅब पाठवावेलागायचे, 24 ते 36 तास त्याचा रिपोर्ट येण्याची वाट पहावी लागायची. मात्रआता अंबाजोगाईत कोविड सेंटर उभारण्यात आल्यामुळे चाचण्या लवकर घेण्यासाठी याचा उपयोग जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्याला होईल. जास्तीत जास्त स्वॅबघेता येतील आणि कोरोनाबाधीतांवर उपचारही करता येतील. कोविड सेंटर मिळावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांसह आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी मोठे प्रयत्न करावे लागले असून या सेंटरसाठी दिल्लीपर्यंत प्रयत्न करावे लागल्याचेही
धनंजय मुंडेंनी सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या सेंटरची मोठी मदत
होईल, असेही मुंडेंनी म्हटले.

No comments:

Post a Comment