Wednesday, March 4, 2026

परळीत शहर पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या युवकास अटक करून तलवार जप्त.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) : परळी शहर पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकास अटक करून त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ मार्च २०२६ रोजी रात्री ११.१० वाजताच्या सुमारास पांढरीचा मळा, हनुमाननगर परिसरात आरोपी सचिन बाळाजी भंडे (वय २५, रा. हनुमाननगर, परळी वैजनाथ, जि. बीड) हा आपल्या ताब्यात बेकायदेशीररीत्या लोखंडी तलवार (किंमत सुमारे ४०० रुपये) बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी धाड टाकून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७/२०२५ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दि. ४ मार्च २०२६ रोजी पहाटे १२.२५ वाजता अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अवैध शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment