Friday, March 6, 2026

गुरव समाजाच्या वतीने संत शिरोमणी काशीबा महाराज पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संत शिरोमणी काशीबा महाराज यांची पुण्यतिथी हनुमान नगर, पांढरीचा मळा, परळी वैजनाथ येथे गुरव समाजाच्या वतीने भक्तीभावात आणि उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी संत शिरोमणी काशीबा महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व आरती गुरव समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी संतांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन, कीर्तन तसेच नामस्मरण आदी कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी काशीबा महाराज यांच्या मंदिराचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून विधिवत करण्यात आले. या प्रसंगी गुरव समाजातील महिला-पुरुष, भाविक भक्त तसेच परळी शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर संत नामाच्या गजराने आणि भक्तिभावाने भारावून गेला होता.
दरम्यान, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी गुरव समाज युवक तालुका अध्यक्ष स्वप्निल (गणेश) पुजारी, राजेभाऊ अण्णा पुजारी, अनिल पुजारी, पपन पुजारी, बाळू पुजारी, सुरेश पुजारी, रमेश पुजारी, गणेश पुजारी, बालाजी पुजारी, सचिन पुजारी, निलेश पुजारी, संतोष पुजारी, बालाजी पाटील, अशोक पुजारी, आकाश पुजारी, राहुल पुजारी, प्रशांत पुजारी, शंकर पुजारी, गौरव पुजारी, वेदांत पुजारी, राम पुजारी, वैभव पुजारी, अभिषेक पुजारी, संदीप पुजारी, प्रदीप पुजारी, अरविंद पुजारी, शुभम पुजारी, सौरभ पुजारी, विजय पुजारी आदींसह गुरव समाजातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment