परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, साहसाचा सागर आणि शौर्याचे शिखर असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२६ सोहळा शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती समितीचे संस्थापक श्री. अभयकुमार ठक्कर व मार्गदर्शक प्राचार्य अतुल दुबे यांनी दिली.
या निमित्ताने शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा मार्केट, परळी वैजनाथ येथे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मा. श्री. राहुलजी गिरी यांचे “छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी, राष्ट्रनिष्ठा व स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून युवकांना प्रेरणा मिळावी, तसेच राष्ट्रभक्तीची जाणीव अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवचरित्रातील शौर्य, धैर्य, संघटन कौशल्य आणि सुशासनाचा आदर्श समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन परदेशी, कार्याध्यक्ष बबन ढेंबरे,माजी नगरसेवक रमेश चौंडे, ज्येष्ठ नेते सतीश जगताप, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, किशन बुंदिले, सचिन लोढा, मनिष जोशी, दिनेश लोंढे,अमित कचरे,लक्ष्मण मुंडे, योगेश घेवारे, माऊली मुंडे,विजय पवार, योगेश जाधव, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, कृष्णा टेके, गणेश काकडे, प्रकाश देवकर, कृष्णा बेदरकर, राहुल फुले यांनी केले आहे.
शिवजयंती निमित्त आयोजित हा भव्य सोहळा परळीकरांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, युवकांनी विशेषतः उपस्थित राहून शिवविचारांचे चिंतन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment