Monday, March 9, 2026

एसटी महामंडळाच्या १७भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांचा पगार सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.


नागपूर (प्रतिनिधी): भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम १७ अ नुसार चौकशी सुरू असलेल्या एसटीतील तब्बल १७ अधिकाऱ्यांचे चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिकार गोठविण्यात आले असून त्यांना कुठल्याही जबाबदारी शिवाय त्याच पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यांना तोच पगार व तोच दबदबा कायम राहिला असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीत हे संयुक्तिक नाही. त्यांना इतर कुठले काम देता येईल या संदर्भात तात्काळ अभ्यास समिती गठित करण्यात आली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

*कारवाईनंतरही अधिकारी पदावर कायम!

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात बरगे म्हणतात, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांचा ‘आरामशीर प्रवास’ मात्र सुरू आहे. विविध भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये अडकलेले तब्बल १७ अधिकारी अजूनही महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

“अधिकार गोठवले तसा प्रभावदेखील गोठवला पाहिजे”

या अधिकाऱ्यांचे प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार गोठविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्यात आल्याने दबदबा कायम आहे.या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे काहीही निर्णय घेण्यास भाग पाडत असल्याची माहिती पुढे आली असून ‘अधिकार गोठले तरी प्रभाव मात्र गोठत नाही’ अशी विचित्र स्थिती निर्माण झाली असल्याची टीकाही बरगे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment