Friday, March 13, 2026

नगरसेविका सौ.शिल्पा लाहोटी यांच्या पुढाकाराने प्रभाग १३ मध्ये पथदिवे सुरू; नागरिकांत समाधान.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – परळी नगर परिषदेच्या मोंढा भागातील प्रभाग क्रमांक १३ च्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ. शिल्पा जयपाल लाहोटी यांच्या पुढाकाराने शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी हालगे गल्ली तसेच मोंढा येथील जुनी हैदराबाद बँकेसमोरील परिसरातील बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या भागातील पथदिवे काही दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेविका सौ. शिल्पा लाहोटी यांच्याकडे सूचना केली होती. त्यांनी या सूचनेची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाशी समन्वय साधून पथदिवे सुरू करून घेतले. त्यामुळे नागरिकांची दीर्घकाळाची समस्या दूर झाली आहे.
तसेच प्रभागात स्वच्छतेलाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून अलीकडेच मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी परिसरात फवारणीही करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे परिसर अधिक स्वच्छ व सुरक्षित राहण्यास मदत होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मोंढा परिसरात कर्तव्यदक्ष नगरसेविका म्हणून सौ. शिल्पा जयपाल शेठ लाहोटी यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या सोबत त्यांचे पती श्री. जयपालशेठ लाहोटी हेही प्रभागातील विकासकामांकडे लक्ष देत असून विविध कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हे काम पूर्ण करण्यासाठी परळी नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे अधिकारी मुक्ताराम घुगे, सचिन उपाडे व महादेव फड यांनीही विशेष प्रयत्न केले. नगरसेविका सौ. शिल्पा जयपाल लाहोटी यांच्या या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment