बीड :(प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कर्णबधिर दिव्यांगत्वाचा लाभ घेणाऱ्या आठ शिक्षकांचे बिंग अखेर अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसॅबिलीज (दिव्यांगजन) या राष्ट्रीय संस्थेच्या तपासणीत उघडे पडले. दिव्यांगत्वाचे लाक्षणिक दिव्यांगत्वापेक्षा कर्णबधीर दिव्यांगत्व कमी असल्याचे सिद्ध झाल्याने या आठ शिक्षकांवरनिलंबनाची कारवाई करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी घेतला आहे. आता पुढच्या टप्प्यात आणखी किती दोषी आढळतात हे पाहावे लागणार आहे.
त्यानुसार बीड शिक्षण विभाग (प्रा.) अंतर्गत दिव्यांग कर्णबधिर शिक्षकांच्या दिव्यांगत्वाबाबत साशंकता निर्माण झाल्याने संबंधित शिक्षकांच्या कर्णबधिर दिव्यांगत्वाबाबत पुनर्तपासणी करण्याबाबत अली यावर जंग नॅशनल, इंस्टिट्यूट ऑफ स्पीच ॲन्ड हिअरिंग डिसॅबिलीज (दिव्यांगजन) या संस्थेत दिव्यांगत्व प्रमाणपत्राची, दिव्यांग कर्मचाऱ्यांची शारीरिक तपासणी करून त्यांच्या दिव्यांगत्वाबाबत, दिव्यांगत्वाच्या टक्केवारीबाबत पुनर्तपासणी करण्याबाबत कळविले होते. तपासणीनंतर या संस्थेकडून श्रवण मूल्यांकन अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार दोषींवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या शिक्षकांवर कारवाई, अहवाल काय सांगतो?.
१) मच्छिंद्र सदाशिव वाघमारे, जि. प. प्रा. शाळा आगरनांदूर, ता. गेवराई (श्रवण मूल्यांकन अहवाल मध्यम श्रवण)२) संतोष किसन सोनवणे, जि. प. प्रा. शाळा खांडेकर वस्ती केंद्र पाली (मध्यम श्रवण दोष)३) दादासाहेब नानासाहेब पवार, जि. प. प्रा. शाळा, वडार कॉलनी, ता. अंबाजोगाई (दोन्ही कानांची श्रवण संवेदनशिलता सामान्य मर्यादेत)४) विलास रामराव माचवे, जि. प. प्रा. शाळा पिंपळगाव धायगुडा, ता. अंबाजोगाई (डावा कान मध्यम, उजवा कान सौम्य श्रवणदोष)५) विकास रामराव माचवे, जि. प. प्रा. शाळा टिळकनगर, केंद्र कारखाना, ता. अंबाजोगाई (डावा कान मध्यम, उजवा कान सौम्य श्रवण दोष)६) युवराज चंद्रभान लांब, जि. प. प्रा. शाळा हनुमंत पिंप्री, केंद्र काळेगाव, ता. केज (डावा कान मध्यम, उजवा कान सौम्य श्रवण दोष)७) शिवाजी देसू चव्हाण, जि. प. प्रा. शाळा जोडवाडी, ता. अंबाजोगाई (दोन्ही कान संवेदशिलता मर्यादेत)८) अंबिका बळीराम बगाडे, जि. प. प्रा. शाळा लोणीघाट, केंद्र चौसाळा कन्या (दोन्ही कानांची श्रवण संवेदनशिलता सामान्य मर्यादेत)
No comments:
Post a Comment