बीड (प्रतिनिधी) : दिवसा बंद घरांची पाहणी करून घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे केज आणि धारूर पोलिस ठाण्यांतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ८ डिसेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की, केज (संभाजी खडे यांचे घर) आणि धारूर (बाबाजी दपलजी यांचे घर) येथील दोन घरफोडीचे गुन्हे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळुंज पारगाव शिवारात राहणारे अक्षय अस्मातूर काळे आणि त्याचे वडील अस्मातूर मोहन काळे यांनी मिळून केले आहेत. पथकाने तातडीने आरोपीच्या घरी जाऊन अक्षय (वय २२) याला अटक केली. त्याने चौकशीत वडिलांसह गुन्हे केल्याची कबुली दिली.
No comments:
Post a Comment