परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ शहरातील अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या श्री बजरंगबली वेताळ मंदिरात, प.पू. विलासानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी श्री दत्तजन्मोत्स वाचा दिव्य आणि भव्य सोहळा अत्यंत दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा, शके १९४७ अनुरूप गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी हा पवित्र उत्सव आयोजित करण्यात आला असून, भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी १२ ते १ या वेळेत महाआरतीचा भव्य सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ५ या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या दिव्य प्रसादाचा लाभ घेणे म्हणजे आध्यात्मिक मंगलप्राप्ती मानली जाते.
श्री दत्तात्रेयांच्या अवतारदिनानिमित्त सर्व भाविकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून दत्तप्रभूंचे दर्शन घ्यावे, भक्तिभावाने सहभागी व्हावे व आशीर्वाद प्राप्त करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मंदिर परिसरात आकर्षक सजावट, भजन-कीर्तन, मंत्रोच्चार आणि दीपप्रज्वलनामुळे संपूर्ण वातावरण दिवसभर भक्तिमय व आनंदमय होणार आहे.
No comments:
Post a Comment