परळी वैजनाथ (प्रतिनिधी) धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित श्री. वैद्यनाथ भक्ती मंडळाचा चौथा वार्षिक उत्सव स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय येथे संपन्न झाला. युवकांच्या संघटनेतून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य सातत्याने राबविणारे हे भक्ती मंडळ समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत असल्याचे प्रतिपादन डॉ. भरत मुंडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.
प्रा.डॉ.शाम नेरकर सर यांनी देवांगण मिरववनिया ! अंगोपचार पुरवणीया ! करावया म्हणीया ! शोभती हात !! या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी प्रमाणे या सर्व भक्ती मंडळाच्या सेवेकऱ्याचे कार्य आहे असे गौरव उद्गार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम, प्रभू वैद्यनाथ, छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता यांच्या प्रतिमांचे तसेच पवित्र भगव्या ध्वजाचे पूजन करून करण्यात आली. यानंतर सामूहिक हनुमान चालीसा पठणाने व ईश्वर स्तुती मंत्राने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या वेळी दत्ताप्पा ईटके गुरुजी, अभयकुमार ठक्कर, विज्ञान मुनीजी, बाळासाहेब देशमुख, ह. भ. प. परमेश्वर महाराज सोडगीर, डॉ. भरत मुंडे, डॉ. विवेक दंडे, डॉ. बालाजी फड, डॉ. दीपक पाठक, डॉ . रविंद्र ईटके ,डॉ . तुषार पिंपळे,उत्तम माने, अॅड. राजेश्वर देशमुख, ह. भ. प. अॅड. दत्तात्रय आंधळे, प्रा. डॉ. नेहरकर, नंदकिशोर बियाणी,बंडू गरुड, ईश्वर प्रभू, रमेश चौंडे, सुरेश टाक, राजेंद्र सोनी, प्रा.प्रवीण फुटके, संजय खाकरे, किरण धोंड ,विष्णुपंत कुलकर्णी, अनंत बिनवडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा श्री. वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व ‘वैद्यनाथ सार’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
आपल्या भाषणात वक्त्यांनी श्री. वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, परळी शहरातील विविध हिंदू धर्मीय मंदिरांची दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात मंडळाचे सदस्य सातत्याने अग्रेसर आहेत. धार्मिक आस्था जपत समाजहिताचे कार्य करणारे हे युवक इतरांसाठी आदर्श असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यनाथ भक्ती मंडळाचे सेवेकरी प्रा. अतुल दुबे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. वैजनाथ कानगुले यांनी मांडले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या सर्व सेवेकरी बांधवांनी अथक परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने भाविक, नागरिक व युवक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
No comments:
Post a Comment