मुंबईसह राज्यात कडाक्याची थंडी पडली असून आजपासून पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ही स्थिती पुढील आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातही थंडीची लाट कायम असून नागपूर, गोंदिया, भंडाऱ्यात पारा १० अंशाच्या खाली गेलाय..हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 11 डिसेंबरपर्यंत देशभरात थंडीची लाट कायम राहील ..त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं.
महाराष्ट्र पुन्हा एकद गारठण्यास सुरूवात झाली आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्याने हुडहुडी भरली आहे. राज्यात धुळ्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. धुळ्यात ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर गोंदिया मध्ये ८.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवासंपासून स्थिर असलेल्या किमान तापमानात पुढील काही दिवस आणखी घट होण्याची शक्यात आहे.
नागपूरमध्ये ८.५ तर अमरावतीमध्ये ९.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यभरात थंडी वाढण्याची शक्यता आहे. दिवसा कमाल तापमानात वाढ होत आहे, तर रात्रीच्या तापमानात घट होत आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment