Monday, December 8, 2025

संताजी जनगाडे महाराजांनी समाजाला दिलेला आदर्श आजच्या पिढीसाठी दीप स्तंभ — प्राचार्य अतुल दुबे

*_यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात संत श्री संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात आज संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य श्री अतुल दुबे यांच्या हस्ते संताजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य श्री अतुल दुबे यांनी यावेळी बोलताना सांगितले की,
"संत श्री संताजी जगनाडे महाराज हे समाजातील प्रत्येक घटकाला उभारी देणारे, समानतेचा संदेश देणारे आणि कर्मयोगावर विश्वास ठेवणारे महान संत होते. त्यांच्या कीर्तनातून व मार्गदर्शनातून समाजाला ज्ञान, नैतिकता आणि सेवाभावाचा महत्त्वपूर्ण संदेश मिळाला. विद्यार्थ्यांनी संताजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि समाजाभिमुख नागरिक बनावे," असे आवाहन अतुल दुबे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयात संताजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या भक्तिमय जीवनाचा व समाजकार्यातील योगदानाचा आढावा विद्यार्थ्यांना देण्यात आला.या वेळी  प्रा.यु.एन.फड, प्रा.पी.पी.तिडके मॅडम, प्रा.ए.एन.खाकरे,प्रा.ए.डी.शेख, प्रा.एस.के.अपार मॅडम,एस. बी.अष्टेकर, व्हि.एन.शिंदे, यु.बी.जगताप यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment