बीड (प्रतिनिधी) बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'सह्याद्री देवराई' प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डोंगरावरील हजारो छोटी-मोठी झाडे होरपळून निघाली असून, निसर्गप्रेमींमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी उशिरा ९ वाजेच्या सुमारास डोंगराच्या एका भागातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि ती संपूर्ण डोंगररांगेत पसरली. आगीची माहिती मिळताच वन विभाग आणि बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. डोंगराळ भाग आणि चढ-उतार असल्याने आग विझवताना जवानांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला. वन कर्मचारी आणि स्थानिक तरुण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
No comments:
Post a Comment