अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) आयडीएफसी फर्स्ट भारतच्या मार्फत सी एस आर च्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ येथे शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याकरिता महिला आणि बाल संरक्षण जनजागृती कार्यक्रम दिनांक 02.12.22 वार - शुक्रवार - वेळ 10:00 am to 11:00am या दिवशी शांततेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून - पीआय- एस. ए. उदार साहेब, (ग्रामीण पोलीस स्टेशन अंबाजोगाई ) आणि Adv. राजकुमार चौरे साहेब (दिवाणी व फौजदारी न्यायालय अंबाजोगाई) , श्री शरद देविदास देडे (सीएसआर झोनल मॅनेजर आयडीएफसी फर्स्ट भारत), पोलीस हवालदार गायकवाड साहेब उपस्थित होते . प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीमाई फूले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .पी आय एस ए उदार साहेब यांनी महिला आणि बाल संरक्षण कसे करावे, अत्यावश्यक सेवेतील नंबर, अत्यावश्यक करिता पोलीस स्टेशनला कसा संपर्क साधावा, व जर हिंसा झालीच तर त्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अॅड .राजकुमार चौरे यांनी महिला व बाल संरक्षण कायदा विषयी मार्गदर्शन केले, श्री शरद देविदास देडे यांनी आयडीएफसी मध्ये चालणारे सीएसआर प्रोग्राम त्याचबरोबर मुलांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. अमोल तुळसे ( शाखाधिकारी-आय डी एफ फर्स्ट भारत अंबाजोगाई), यांनी बँकेच्या सुविधा विषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी उपस्थित शाखेमधील सर्व स्टाफ उपस्थित होते. आयडीएफसी फर्स्ट भारत सीएसआर च्या माध्यमातून समाजाची बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. त्याच पैकी आजचा महिला व बाल संरक्षण जनजागृती हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांना खूप महत्त्वाची माहिती पोहोचवण्यात आली.
कार्यक्रमासाठी शाळेतील एल .व्ही. जाधव मॅडम , मीरा गुळभिले मॅडम , मीरा सरवदे मॅडम , एम.एम.तोडकर मॅडम , वर्षा इंगोले मॅडम, ए .एम. लांब मॅडम, गौतम कांबळे , एम.एम.गायकवाड , निळकंठ जिरगे ,संतोष गायकवाड , आदि सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थानी शाळेतील मुख्याध्यापिका सौ . मीना हजारे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मीना अंबूरे मॅडम यांनी केले, तर आभार दत्ता कसबे सर यांनी मानले.
No comments:
Post a Comment