नाशिक ( प्रतिनिधी) रेणुकामाता कुलदैवत असणाऱ्या व नात सांप्रदायातील संत अवजीनाथ महाराज सद्गुरू वामनभाऊ महाराज, राष्ट्रसंत भगवानबाबा व स्व गोपीनाथराव मुंडे साहेब राजकीय दैवत असलेल्या वंजारी समाजातील साहित्य क्षेत्रात प्रथम साहित्य संमेलना निमित्ताने या वर्षी पासुन एक नवीन परंपरा उदयास येत आहे
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य उद्योग, साहित्य आघाडीच्या प्रथम साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रशांतजी आंधळे ( खंबाळकर) यांच्या मातोश्री स्व.सुदराबाई मुरलीधर आंधळे ता. सिन्नर जिल्हा नाशिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुंदराबाई मुरलीधर आंधळे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार साठी आपलं सामाजिक, समाजसेवा, तथा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्या अलौकिक कार्याबद्दल आपली निवड सदर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार साठी निवड झाली आहे.
स्थळ: मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे रावसाहेब थोरात सभागृह गंगापुर रोड नाशिक दि २५/१२/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता नाशिक येथे साहित्य संमेलनाच्या ठिकाणी सदर पुरस्कार राज्यातील नामवंत मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.आपली राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार साठी निवड झाल्याबद्दल आपले सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment