परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत विद्यावर्धिनी विद्यालयाची इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थीनी कु गायत्री तुळशीराम प्रयाग राज्यस्तरीय कॅरम स्पर्धसाठी १९ वर्षांखालील गटात पात्र ठरली आहे. ही विद्यार्थीनी सावंतवाडी, जिल्हा सिधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत आपल्या विभागाचे नेतृत्व करेल.ही स्पर्धा दिनांक २४ व २५ डिसेंबर रोजी सावंतवाडी, जिल्हा सिधुदुर्ग येथे होईल.
या यशस्वी विद्यार्थीनीचे व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी जी ईटके, संस्थेचे सदस्य एस एस कोळगे, एस बी भिंगोरे, एम टी मुंडे, पी जे पैंजणे, परळीचे गटशिक्षणाधिकारी सोनवणे ,विद्यावर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मातेकर, सर्व शिक्षक बंधू भगिनीनी केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment