याबाबत अधिक माहिती अशी की, मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतावर कामाला आहे. शुक्रवारी सकाळी आईवडील शेतात कामाला गेल्याने त्यांची १७ वर्षीय मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळने पीडित मुलीला शेजारील उसाच्या फडात ओढत नेले. तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला.
दरम्यान, एका महिलेने सामुहिक अत्याचार होत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले. या घटनेमुळे दिंद्रुड परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात एका महिलेसह महादेव सुधाकर फपाळ, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ आणि अक्षय अर्जुन फपाळ यांच्यावर बाललैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी आयपीएस डॉ. धीरज कुमार बच्चू यांनी दिंद्रुड पोलीस स्टेशनला भेट दिली.
दरम्यान, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ व अक्षय अर्जुन फपाळ या तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले. ही कारवाई दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, युवराज श्रीडोळे, विशाल मुजमुले, मुकेश शेळके, रेवण दुधाने यांनी केली. यातील दोन आरोपी फरार असून पुढील तपास डॉ. धीरजकुमार बच्चू करत आहेत.
No comments:
Post a Comment