Saturday, December 24, 2022

पोदार जम्बो किड्स, प्रिया नगर शाळेचा स्पोर्ट डे मोठ्या उत्साहात साजरा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी संचलित पोदार जम्बो किड्स , प्रिया नगर परळी शाळेचा स्पोर्ट डे मंगळवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शालीनी कराड मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी शाखा परळी चे मॅनेजर श्री. कपिल सर तसेच दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल चे प्रिन्सीपल श्री. विठ्ठल तुपे सर हे होते.
विद्यार्थीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी च्या अध्यक्षा सौ. उषा किरण गित्ते मॅडम यांच्या मार्गर्शनाखाली पोदार जम्बो किड्स वेगवेगळे उपक्रम राबवित असतात त्यातच *जम्बो ऑन विल्स* या संकल्पनेतून वेलकम साँग, टॉर्च लाईट, मार्च पास, सिग्नल रेस, इंजिन रेस, यरोप्लेन रेस, पालकांसाठी रीले रेस, वॉकिंग रेस    इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या मनोगातून डॉ. शालीनी कराड मॅडम म्हणाल्या विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी ने परळी सारख्या ठिकाणी खूप छान शेक्षणिक वातावरण निर्माण केले आहे त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम व श्री. किरणकुमार गित्ते साहेब यांचे पालक या नात्याने आभार मानते. 
कोवळ्या वयात शारीरिक, बौद्धीक, मानसिक व सामाजिक व्यक्तीमत्त्व विकास व्हावा यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात ही खूप चांगली बाब आहे. मोबाईल च्या युगात लहान मुलांना खेळाविषयी आवड निर्माण होणे गरजेचे आहे, सर्व पालकांनी मुलांना मोबाइल न देता मैदानी खेळा विषयी आवड निर्माण करावी. 
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. सुरेखा तुपे मॅडम यांनी मांडले तर कार्यक्रमासाठी सौ.सुजाता मॅडम, सौ. मंदाकिनी मॅडम, सौ. सुहासिनी मॅडम यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment