इन्फंट इंडियाचे संचालक बारगजे कुटुंबीय मतदानावरुन परत येताना सायंकाळी सहाच्या सुमारास ते इन्फंट इंडियाला परतले. यावेळी रस्त्यावरील एका दानपेटी शेजारी त्यांना ही चिमुकली आढळून आली. या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासले असता सध्या तिची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस अज्ञात निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.
अज्ञात मातेविरूद्ध गुन्हा
सदरच्या स्त्री जातीच्या अर्भकाला टाकून गेल्या प्रकरणी अज्ञात माते विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पोलीस निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.
No comments:
Post a Comment