डॉ.शामसुंदर दगडूराम काकाणी (रा.समता कॉलनी माजलगाव) असे फसवणूक झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. फ्लिपकार्टवर त्यांनी एक पार्सल मागवले होते. मात्र ते पार्सल त्यांना परत करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च करून फ्लिपकार्ट कस्टमर केयरचा नंबर शोधला. तेथे त्यांना इंडिया कस्टमर केयर असा उल्लेख आढळला. तसेच त्याठिकाणी कॉल नॉउ असा उल्लेख असल्याने त्यावर त्यांनी क्लिक केले असता एक नंबर स्क्रिनवर दिसला. डॉ. काकाणी यांनी त्या नंबरशी संपर्क केला असता समोरून बोलणार्या अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये एनीडेस्क अॅप डाऊनलोड करण्याचे सांगितले.
.त्याच्यावर विश्वास ठेवत डॉ.काकाणी यांनी ते अॅप डाऊनलोड केले अन इथेच त्यांची फसवणूक झाली. पार्सल तर परत पाठवता आलेच नाही मात्र सायबर भामट्याने खात्यातील 75 हजार रुपय पळवून डॉक्टरला चुना लावला . याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात डॉ.काकाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment