Wednesday, December 21, 2022

परचुंडी सरपंच सौ.मीना नावंदे यांच्यासह तीन सदस्य विजयी.भीमाशंकर नावंदे ठरले किंग मेंकर.पंकजाताई मुंडे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परचुंडी ता.परळी वैजनाथ येथील ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ.मीना गुरूलिंगअप्पा नावंदे या विजयी झाल्या असून याच पॅनलचे तीन उमेदवार सदस्य म्हणून निवडून आले आहेत. प्रसिद्ध छायाचित्रकार भीमाशंकर नावंदे यांनी येथे पॅनल टाकून निवडणूकीत चांगलीच रंगत भरली होती. भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा होता. पंकजाताई मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले आहे. 
परचुंडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.मीना गुरूलिंगअप्पा नावंदे या विजयी होवून त्याच पॅनलचे सौ.छाया रामराव सरांडे, सीमा परमेश्वर थोरात व मारोती राघु थोरात यांनी सुद्धा विजय मिळविला आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भीमाशंकर नावंदे यांनी विशेष पुढाकार घेत येथे पॅनल उभे केले होते. अत्यंत अटीतटीच्या निवडणूकीत सौ.मीना नावंदे या सरपंच म्हणून या निवडून आल्या आहेत. 

दरम्यान परचुंडी येथील विजयी सरपंच  सौ.मीना गुरूलिंगअप्पा नावंद तसेच सदस्य सौ.छाया रामराव सरांडे, सीमा परमेश्वर थोरात व मारोती राघु थोरात यांचा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. पंकजाताई मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment