Friday, December 2, 2022

छत्रपती शिवराय यांचा अवमान केल्याप्रकरणी शिवप्रेमी च्या वतीने राज्यपाल कोशारी हटाव जिल्हा कचेरी समोर तीव्र धरणे निदर्शने.

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोशारी हटाव यासाठी जिल्हा कचेरी समोर शीव प्रेमी  यांची उग्र तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात आली.यामध्ये अशोक हिंगे, डॉ. गणेश ढवळे, कुंदा काळे,अभिमान खरसाडे, प्रा. शिवाजी खांडे, गणेश मस्के, अशोक येडे कमलाताई निंबाळकर, विद्या जाधव, युवराज मस्के, रमेश चव्हाण, सुनील सुरवसे,अविनाश नाईकवाडे, रामनाथ खोड, बापूसाहेब शिंदे, ज्ञानदेव काशीद, गणेश धोंडरे, संतोष डोंगरे, दयानंद गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी हे नियमितपणे बेताल वक्त करून महापुरुषाचा अपमान करत आहेत यापुर्वीही त्यांनी महात्मा फुले बाबत आक्षेपार्ह विधान केले.अलीकडेच त्यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमीच्या भावना दुखून छत्रपती शिवरायांचा अवमान केला आहे जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला व पंतप्रधान व राष्ट्रपती यांना देखील शिवप्रेमीच्या भावना कळव्यात म्हणून निवेदनाद्वारे राज्यपाल कोशारी  हटाव ची मागणी करण्यात आली आहे तसेच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील शिवरायांच्या विटंबनेची परंपरा जोपासत शिवचरित्रावरची चिखलफेक  केली आहे त्या अनुषंगाने त्यांची भाजपच्या प्रवक्ते पदावरून त्यांना हटवुन छत्रपती शिवरायांची व महाराष्ट्रातील शिवप्रेमींची माफी मागावी तसेच हर हर महादेव व वेडात मराठे वीर दौडले सात या शिवचरित्राची मोडतोड करणाऱ्या चित्रपट बंदी घालण्याच्या निर्णय सदनात राज्याच्या वतीने घेण्यात यावा

 निवेदनात या सर्व मागण्या करण्यात आल्या आहे वरील सर्व प्रकार निंदनीय आहेत राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते या नात्याने ठोस उपाय अथवा प्रतिबंधात्मक पवित्र घेण्यास विसर पडल्याने जाणून येत आहे याचा अर्थ अशा अपप्रवृत्तीला आपण मूक पाठिंबा आहे हे सुचित होते आहे, त्या अनुषंगाने आपण नैतिक जबाबदारी व शिवराया प्रति स्वाभिमान जपण्यासाठी आदर भावनेची जबाबदारी स्वीकारून आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता जोपसावी अशी मागणी बीड येथील शिवप्रेमी यांनी केली आहे यावेळी सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने धरणे निदर्शने आंदोलनात सहभागी होते याप्रसंगी जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.

No comments:

Post a Comment