Friday, December 4, 2020

पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी दिली कोरोना लसीविषयी माहिती वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल देताच भारतात लसीकरण सुरू होईल.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मोदींनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मोदींना कोरोनाची लस कधी उपलब्ध होणार, ती सर्वात आधी कोणाला दिली जाणार यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. एकिकडे कोरोनाची लस निर्मिती सुरु असली तरी तरी दोन फुटांचं अंतर, मास्क या मूळ गोष्टी लक्षात ठेऊन कोरोनासंदर्भात बेसावध राहणे परवडणार नाही, असे इशाराही मोदींनी दिली. देशात कोरोनाच्या ८ लसींवर काम सुरु असून त्यात ३ लस भारतीय बनावटीच्या आहेत, असेही मोदी म्हणाले.

यावेळी मोदी म्हणाले, 'तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील काही आठवड्यात कोरोना लस तयार होईल. वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल देताच भारतात लसीकरण सुरु होईल. लसीचा साठा आणि रिअल टाईम इन्‍फर्मेशनसाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होते तेव्हा अनेक अफवा उठतात. या अफवा जनहीत आणि देशहीताच्या विरोधात असतात. सर्वांना मी आवाहन करतो की लोकांना या लसीसंदर्भात जागृक करा आणि कोणत्याही अफवांना बळी पडणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावे,' असे आवाहन मोदींनी केले आहे.

भारतात कोरोना लस कधी येणार यावर मोदी म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांसोबत माझी चर्चा झाली. आपल्या वैज्ञानिकांना यशाबाबत खात्री आहे. भारतात लस चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत आहे आणि त्यांचे उत्पादन भारतातच होणार आहे. देशाच्या तीन लस देखील विविध टप्प्यात आहेत. तज्ज्ञांचे मते लसीकरण फार दूर नाही, असेही मोदी यांनी सांगितले.

कोरोना लस आल्यानंतर ती सर्वात आधी कोणाला देणार याविषयी पंतप्रधान मोदींनी माहिती दिली. ते म्हणाले, 'पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, मग फ्रण्टलाईन कर्मचारी आणि वयोवृद्ध व्यक्ती तसेच गंभीर आजारी असलेल्या लोकांना लस दिली जाईल. केंद्र आणि राज्‍य सरकार लसीच्या वितरणासाठी वेगाने काम करत आहे."

पंतप्रधानांनी कोरोना लसीमध्ये अनुदान मिळण्याचे संकेत दिली आहेत. केंद्र आणि राज्‍य सरकार लसीच्या खर्चावर चर्चा करत आहे. लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन यावर निर्णय होईल. यामध्ये राज्‍य सरकारांची भूमिका महत्त्वाची असेल, असेही मोदी म्हणाले.

या बैठकीत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते गुलाम नबी आजाद, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंधोपाध्याय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, टीआरएसचे एन एन राव, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत बैठकीत सामील झाले.

No comments:

Post a Comment