Sunday, June 21, 2020

100 गरजु कुटुंबाना किराणा साहित्य यूपीएल एडव्हनंटा सिड्स कंपनी आणि कार्ड संस्थेच्या वतीने वाटप.

जालना, दिं 21, (प्रतिनिधी), कोरोना चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लोकं त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी लागणार साहित्य खरेदी करण्यासाठी रस्त्यावर येऊ नये,गरीब व गरजूचे कुपोषण होऊ नये यासाठी यूपीएल ऍडव्हँटा सिड्स कंपनी आणि कार्ड संस्था जालना यांच्या संयुक्त विद्यमाने किराणा साहित्य कंपनीचे अधिकारी अब्दुल खलील,राहुल आकुस्कर,गजानन बनसोडे,दीपक पाटील,दत्तात्रय ननई,महाएनजिओ फेडरेशन,मलोविमं चे जिल्हा समनव्यक तथा कार्ड चे सचिव पुष्कराज तायडे यांच्या हस्ते जालना, जाफराबाद, बोरगाव जहागीर ता भोकरदन, देऊळगाव राजा,किंन्ही ता देऊळगांव राजा येथे करण्यात आले 
    यूपीएल एडव्हँटा सिड्स कंपनी व कार्ड च्या वतीने गरीब व गरजु कुटुंबाचा सर्व्हे करून अगदी गरीब व गरजू 100 कुटुंबाची निवड करून मजुरी काम करणाऱ्या कुटुंबाना प्रत्येकी 600 रुपये किंमतीची किराणाची किट आज वाटप करण्यात आले आहे. 
या प्रत्येक किराणा किट मध्ये 5 किलो गव्हाचे पीठ,1 लि.तेल,100grm मसाले,50 ग्राम हळद,1 किलो मिठ,1किलो साखर,100 ग्राम चहापत्ती,साबण,सॅनिटायझर, डिटर्जंट पावडर आदी साहित्य दिले म्हणजे 10 दिवस तरी घराबाहेर कोणी येणार त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची शिकार होणार नाही.शिवाय आपण दररोज खिचडी सारखे अन्न पदार्थ तयार करून वाटप करणं हे पण आपली जोखीमच आहे. जसे आपण गरजूंना अन्न पोहचवून घास भरवतो त्यातून कोण कोरोना पॉझिटिव्ह आहे हे कळत नाही चुकून आपला बाधित व्यक्तीशी संपर्क आल्यास आपण ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतो हे नाकारता येणार नाही. त्यामुळे किराणा सामानच देणं गरजेचं आहे. म्हणून किराणा जीवनावश्यक वस्तू देन्यात आल्या आहेत.अशी माहिती कार्ड संस्थांचे सचिव पुष्कराज तायडे यांनी दिली आहे. या वाटपासाठी प्रा सुवर्णा दांडगे, प्रा डॉ रामदास निहाळ,भारत खरात,माया घोरपडे, अर्पणा खरात,प्रणव तायडे, भरत दांडगे ,कैलास दांडगे, शरद दांडगे यांनी परिश्रम घेतले.

1 comment: