Tuesday, August 6, 2024

मा.मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर विचारमंचच्या बीड विधानसभा महिल आघाडीची धुरा सौ.जयश्री विधाते यांच्या हाती - मा.आ.जयदत्तजी क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी) बीड विधानसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर आज मा.मंत्री जयदत्त (आण्णा) क्षीरसागर विचारमंचच्या महीला आघाडीची बैठक बोलवण्यात आली होती.  या बैठकीत महीला भगीनींना मार्गदर्शन करताना माजी मंत्री जयदत्तजी आण्णा क्षीरसागर साहेब यांनी बीड विधानसभेचे रणसिंग फुंकत बीड नगरपरिषदेच्या मा. सभापती तथा नगरसेविका सौ. जयश्री विलास विधाते यांची बीड विधानसभा महीला आघाडी प्रमुख म्हणून घोषणा केली. 
आजपासुन विधाते ताईच्या नेतृत्वात महीला आघाडी विधानसभेचच्या रणांगणात. आपण आजवर केलेल्या विकासकामाचा लेखाजोखा सामान्य मतदार भगींनीनीन पर्यंत घेऊन जातील अशा माता भगनींन च्या आशिर्वाद आणि शुभेच्छातुन उभा राहाणारी स्त्री- शक्ती येणाऱ्या विधानसभेत यश आपल्या पदरात पाडून घेईल आसा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी जयश्री विधाते यांनी पदभार स्वीकारत बैठकीला संबोधित करताना म्हणाल्याआण्णासाहेबांनी महीला आघाडी प्रमुख पदांची टाकलेली जवाबदारी सर्व कार्यकर्ता भगीनींच्या सहकार्याने रात्रींचा दिवस एक करुन आण्णासाहेबांना प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून बीड विधानसभेला गत वैभव प्राप्त करून देऊ असा निर्धार केला.
 
या वेळी व्यासपीठावर नगरसेवक  मुखिदलाला , सनी वाघमारे सलीमभाई,  पंचायत समिती सभापती उषाताई सरवदे, नगरसेविका सुशिलाताई नाईकवाडे, भारतीताई क्षीरसागर, अनिता ताई डोंगरे , शेख सीमा तब्बसुम शेख अजित सुलताना यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.संगीताताई शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन किर्तीताई पांगारकर यांनी केले यावेळी बीड शहरातील महीला आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment