परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वीरशैव लिंगायत समाज आणि श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्या वतीने आयोजित श्रावणमास तपोनुष्ठान व शिवनाम सप्ताह मोठ्या सुरू असून मंगळवार 13 ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तिपूर्वक संपन्न झाला. याप्रसंगी शि.भ.प.रजनीताई मंगलगे गंगाखेडकर यांनी आपल्या कीर्तनाने उपस्थितांना भक्तिसुंदर अनुभव दिला.
या 13 दिवसीय तपोनुष्ठान सोहळ्यात अन्नप्रसाद, अखंड शिवनाम सप्ताह, परमरहस्य पारायण, कीर्तन, प्रवचन, वृक्षदान, वृक्षारोपण, जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक व समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दि.14 अॉगस्ट रोजी गुरूवर्यांचे पुजन व महाप्रसादाचे आयोजन श्री.अमर विजयकुमारअप्पा नरवणे व श्री.सुभाषअप्पा रंगनाथअप्पा वाघमारे परीवाराच्यावतीने करण्यात आले.दररोज प्रसादाच्या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.गुरूवर्यांची आरती नवगण कॉलेजचे प्राचार्य डॉ.मधुकर अघाव,माजी जि.प सदस्य श्री.लक्ष्मीकांतराव देशमुख,उपप्राचार्य एल.बी.घुमरे,अन्नपूर्णा चॅरीटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री.अनिल लाहोटी,एलआयसीचे डेव्हलपमेंट अधिकारी श्री.प्रमोद भालेराव यांच्यासह समाजबांधवांच्यावतीने आरती करण्यात आली तसेच तपोनुष्ठान समितीचे कार्यअध्यक्ष श्री.चंदूअप्पा उदगीर यांची नवगण कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शिव भक्तांनी
यावर्षीच्या तपोनुष्ठान, परमरहस्य पारायण सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन द्वादश पंचम् ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीतील प्रमुख पदाधिकारी आणि आयोजकांनी केले आहे.या उपक्रमाच्या यशस्वितेतून शहर व परिसरातील सर्व शिव भक्तांना अध्यात्मिक व सांस्कृतिक लाभ प्राप्त होईल,अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे तरी जनकल्याणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या तपोनुष्ठान, परमरहस्य पारायण सोहळ्याचा शहर व परिसरातील सर्व शिव भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन द्वादश पंचम् ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीतील ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या द्वादश श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,कार्यअध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,शाहूराव ढोबळे,उपाध्यक्ष रमेशअप्पा सपाटे,मकरंद नरवणे,प्रा.महेश्वर निर्मळे,रघुनाथअप्पा भाग्यवंत,चंदूअप्पा हालगे,संतोष पंचाक्षरी,मनोज संकाये,सचिव सोमनाथअप्पा निलंगे,सहसचिव प्रकाश खोत,शिरीष सलगरे,रवीअप्पा मिसाळ,अशोक नावंदे,दत्ता गोपनपाळे,कोषाध्यक्ष सोमनाथ गोपनपाळे,पारायण प्रमुख दयानंद चौधरी,समन्वयक संजय खाकरे,प्रा.प्रवीण फुटके,सचिन काटकर,गणपत हरंगुळे,कैलास रिकीबे,सदानंद चौधरी,रमाकांत बुरांडे,जगदीश मिटकर,गिरीष बेंबळगे,संतोष जुजगर,अतुल बेंडे प्रमुख पदाधिकारी वैजनाथ(बबन)शेटे,बबनअप्पा नाईक,गिरीष संकाये,रमेश चौधरी सर,गणेश स्वामी,संदीप चौधरी,उमाकांत पोपडे,दीपक कापसे,कपील चौधरी,अनिल मिसाळ,बाळू चौधरी,नंदू शेटे,दयानंद स्वामी,योगेश स्वामी तसेच वीरशैव समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment