Wednesday, August 28, 2024

६० पेक्षा अधिक बुलेट गाड्यांचे सायलेन्सर जप्त करून दंडात्मक कारवाई. पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत सायलेंसरवर फिरविला बुलडोझर.


*कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट राजाचा रुबाब उतरविल्याने अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले गंगाखेड पोलीसांचे केले कौतुक

गंगाखेड (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत  शहरातील रस्त्यावर कर्णकर्कश आवाज करत रुबाबात फिरणाऱ्या बुलेट राजांच्या सायलेंसरवर बुलडोझर फिरविला आहे. गंगाखेड पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचाऱ्यांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट राजाचा रुबाब उतरविल्याने अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

बुलेटला बसविलेले कंपनीचे सायलेन्सर काढून त्याजागी पटीयाला सायलेन्सर, फटाका सायलेन्सर व इंदौर सायलेन्सर असे कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर लाऊन शहरातील रस्त्यावर कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट राजा विरुद्ध गंगाखेड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे काम पाहणारे सपोउपनि वैजनाथ अडोडे, पो. शि. प्रशांत व्हावळे, शंकर गयाळ आदी कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून विशेष मोहीम राबवित विविध भागात कारवाई करून सुमारे ६० पेक्षा अधिक बुलेट गाड्यांचे सायलेन्सर काढून घेत जप्त करून दंडात्मक कारवाई करत दि. २८ ऑगस्ट बुधवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे आदींच्या उपस्थितीत जप्त केलेल्या सायलेंसरवर पोलीस स्टेशन परिसरात बुलडोझर फिरवून निकामी करण्यात आले. गंगाखेड पोलीसांनी केलेल्या या कारवाई बद्दल पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी समाधान व्यक्त करीत सपोउपनि वैजनाथ आदोडे, प्रशांत व्हावळे, शंकर गयाळ यांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment