Wednesday, August 28, 2024

तीनशे विद्यार्थ्यांची फीस घेऊन शिकवणी चालक फरार.पालकांत संताप. लातूर पॅटर्न ला काळींबा.


लातूर (प्रतिनिधी):- शहरातील शिकवणी परिसरात असलेल्या न्यू दिशा फिजिक्स क्लासेस संचालकांनी येथील तब्बल तीनशे विद्यार्थ्यांची फीस घेऊन पसार झाल्याची घटना घडली असून सदर संचालकांच्या विरोधात विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आहेत.

संचालकांच्या विरोधात विद्यार्थी आणि पालक आक्रमक

सदर घटनेबाबत क्लासच्या विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती अशी की शिकवणी परिसरात असलेल्या न्यु दिशा फिजिक्स क्लासेसमध्ये फिजिक्स या एक विषयाची शिकवणी क्लास मागील महिन्यात सुरु होणार होता. यासाठी शहरातील विविध महाविद्यालयाच्या जवळपास तीनशे विदयार्थ्यांनी प्रति विध्यार्थी 25 हजार रुपयाप्रमाणे विदयार्थ्यांनी रोख, ऑनलाईन अशा पद्धतीने संचालक प्रा. शशीधर आणि प्रा. चंदनकुमार (पी. के. सर) यांच्याकडे फीस भरली असल्याचे विद्यार्थी सांगतात. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः जुलै महिन्यात सदर बॅच चालू होणार होती. मात्र संचालक यांनी सदरची बॅच सुरु केली नाही आणि दोन्ही सरांचा संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांना लक्षात आले.

जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे की नाही?

मागील दोन दिवसांपासून सदर क्लासच्या समोर विद्यार्थी गोंधळ करत असल्यामुळे नेमका काय प्रकार झाला याबाबत चर्चा सुरु झाली. याबाबत मोठया संख्येने पालक जमून क्लासचे संचालक यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. क्लासचे कार्यालय बंद असल्यामुळे याबाबत अधिकृत कांही समजू शकले नाही. दरम्यान अशा कोचिंगवर शिक्षण विभाग पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे की नाही? असा प्रश्न लातूरकर उपस्थित करीत आहेत.

No comments:

Post a Comment