Wednesday, August 7, 2024

ई - पॉज मशीन सर्व्हर डाऊन. तहसील कार्यालयवर रेशन दुकानदार संघटनेच्या मोर्चा.


परभणी (प्रतिनिधी):- तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांवर मागील काही दिवसांपासून ई – पॉज मशीन सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटप करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाने ई – पॉज मशीन जमा करुन घेण्याची विनंती तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाभरातील राशन दुकानदार आक्रमक

सर्व्हर डाऊन असल्याने धान्य वाटपास अडचणी निर्माण होऊन त्यामुळे ग्राहक दुकानदारास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी १ ऑगस्ट रोजी या संदर्भात संघटनेने तहसिल कार्यालयास पूर्व सूचना दिली होती. त्यामुळे ई – पॉज मशीन जमा करुन घेण्याची विनंती संघटनेने केली आहे. निवेदनावर महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव, कोषाध्यक्ष मारोतराव खटिंग, सचिव नारायण वाघमारे, तालुकाध्यक्ष पवन बनसोडे, शेख मुनीर, शहराध्यक्ष सुधाकर देशमुख, विजयकुमार कांकरीया, दत्तराव अंभुरे, आर.के.भिसाड, शिवाजीराव घाडगे, विकास देवडे, बजरंग पदमगीरवार, आर.बी. कनकदंडे, प्रशांत गायकवाड, एस.एस. भराड, सुमित्रा लझडे, मनकर्णा झाडे व कपिल पैठणे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


No comments:

Post a Comment