Friday, August 9, 2024
बॉयफ्रेंड ला फिरायला घेऊन गेली ; अन् तिथेच घात केला; महाराष्ट्र हादरला महाराष्ट्र हादरला !
बुलढाणा (प्रतिनिधी) बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीने लोणार सरोवरात फिरण्याच्या बहाण्याने तिच्या आधीच्या प्रियकराला आणलं. लोणार सरोवराजवळ आणल्यानंतर नियोजित कटानुसार दबा धरुन बसलेल्या प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराने मागून गळा आवळत तरुणाची हत्या केली. मृत तरुण आणि आरोपी हे दोघंही परभणी जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि प्रेयसीला अटक केली आहे. अर्जुन दिलीप रोडगे, वय वर्ष २८ असं मृत तरुणाचं नाव आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment